वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरने घेतली एक हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:02 PM2020-06-16T20:02:26+5:302020-06-16T20:03:47+5:30

चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली.

A doctor in Gadchiroli district took a bribe of Rs 1 k | वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरने घेतली एक हजारांची लाच

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरने घेतली एक हजारांची लाच

Next
ठळक मुद्दे चामोर्शी येथील कारवाई एसीबीने रंगेहात पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली. डॉ.मनोज भिवाजी पेंदाम (४१) असे लाच घेणाºया डॉक्टरचे नाव आहे.
डॉ.पेंदाम हे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील एका वाहन चालकाला चंद्रपूर येथे जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता होती. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असल्याने त्यांनी डॉ.पेंदाम यांच्याकडे संपर्क केला. मात्र पेंदाम यांनी त्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान संबंधित तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क केला. त्यानुसार मंगळवारी सापळा लावून डॉ.पेंदामला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात हवालदार नत्थू धोटे, नायक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, शिपाई महेश कुकुडकर यांनी केली.

Web Title: A doctor in Gadchiroli district took a bribe of Rs 1 k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.