स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ लाख ९२ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई आरमोरी परिसरातील रवी जंगल परिसरात ८ फेब्रुवारी रोजी २ वाजताच्या सुमारास केली. ...
घरकुलाच्या रकमेची उचल करूनही घर न बांधणाऱ्या लाभार्थ्यास दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय रामलाल डोंगरे (४३) रा. गांधी वार्ड गडचिरोली असे शिक्षा झालेल्या लाभार्थ्याचे नाव आहे. ...
वनहक्क कायद्यांतर्गत ज्या शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याही शेतकऱ्यांना केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ...
भामरागड येथील समूह निवासी शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळेचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मूल्यांकन पथक भामरागड येथे ६ फेब्रुवारी रोजी दाखल झाले. या पथकाने शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ...
एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले. ...
सरकार कोणते बसवायचे एवढी ताकद मतदानामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही सुदृढ करावी, भयमुक्त वातावरणात निवडणुका होतील, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष योगीता भांडे ...
जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी घोट तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर घोट व परिसरातील जनता सामूहिक बहिष्कार टाकेल, असा इशारा घोट येथे आयोजित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. ...
स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने सोमवारी सायकल रॅली काढून कॅन्सर रोगाबाबत जनजागृती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. ...
ब्रिटिश कालावधीत स्थापना झालेल्या चामोर्शी येथील जि.प.केंद्र शाळेला भौतिक सुविधांची प्रशासनाने पूर्तता केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी ५ फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप ठोकले. दुसऱ्या दिवशी बुधवारी आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह अधिकाऱ्यांनी शा ...