उन्हाळी धान लागवड घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:36 PM2019-02-07T23:36:16+5:302019-02-07T23:36:46+5:30

जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात.

Summer Paddy cultivation will decrease | उन्हाळी धान लागवड घटणार

उन्हाळी धान लागवड घटणार

Next
ठळक मुद्देजलसाठे आटले : अडीच हजार हेक्टरवर रोवणीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात. प्रामुख्याने आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यातील काही भागात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. कडक उन्हाळ्यापर्यंत धानाला पाणी द्यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे मुबलक पाणी साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बोड्या व इतर जलसाठे आटले आहेत. पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली नसल्याचे दिसून येते. उन्हाळी धान पिकाऐवजी शेतकºयांनी रबी हंगामातील इतर पिके घेण्याकडे वळला आहे. विशेष करून रबी हंगामात मक्याचे पीक चांगले येत असल्याने शेतकरी वर्ग मका पीक घेण्याकडे वळत चालला आहे. तर काही शेतकºयांनी भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. उन्हाळी धान पिकाच्या रोवणीची कामे सुरू झाली आहेत.
यावर्षी हंगामात जवळपास २ हजार २६० हेक्टरवर धानपिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने आठ दिवसांपूर्वी गोळा केलेल्या माहितीनुसार गडचिरोली ८, कुरखेडा ३८, आरमोरी ८५, सिरोंचा ७०, अहेरी ३, कोरची २, देसाईगंज ४३ हेक्टरवर पºहे टाकण्यात आले आहेत. काही भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत असल्याने रोवणीची कामे लवकरच आटोपतात. सिरोंचा तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तलाव, बोड्यांचीही संख्या कमी आहे. मात्र या तालुक्यातील शेतकरी केवळ बोअरच्या माध्यमातून धानाची शेती करतात. धानासोबतच इतरही पिकांची लागवड करतात. आसरअल्ली, अंकिसा परिसरातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीक मका यांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.

उन्हाळी धान पिकाला मिळतो कमी भाव
खरीप हंगामातील धानापेक्षा उन्हाळी धान पिकाला कमी भाव मिळतो. खरीपातील धानाच्या तुलनेत या धान पिकाला खर्च अधिक राहतो. कडक उष्णता व जमिनीतील पाणी यामुळे दमट वातावरण निर्माण होऊन कधी कधी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यात वादळ वाºयासह पाऊस झाल्यास धान पिकाचे मोठे नुकसान होते. हा अनुभव शेतकºयांना येत चालला असल्याने काही शेतकरी या धान पिकाची लागवड करण्यास तयार होत नाही. मात्र जे शेतकरी उत्तमरीतीने धान पिकाची काळजी घेऊ शकतात, अशा शेतकºयांना धानाचे उत्पादन अधिक होत असल्याने हे शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उलट इतरही पिकांची लागवड करतात.

मक्याचे क्षेत्र वाढतीवर
कमी खर्चात अधिक उत्पादन होत असल्याने शेतकरी वर्ग मका पिकाची लागवड करण्याकडे वळला असल्याचे दिसून येते. कुरखेडा, चामोर्शी भागामध्ये मका पिकाची लागवड केली आहे. एवढेच नव्हे तर मालेवाडा परिसरातील दुर्गम भागात सुध्दा मका लावला आहे.

Web Title: Summer Paddy cultivation will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.