कॅन्सर जनजागृतीसाठी सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:28 AM2019-02-07T01:28:06+5:302019-02-07T01:28:53+5:30

स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने सोमवारी सायकल रॅली काढून कॅन्सर रोगाबाबत जनजागृती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.

Cycle Rally for Cancer Awareness | कॅन्सर जनजागृतीसाठी सायकल रॅली

कॅन्सर जनजागृतीसाठी सायकल रॅली

Next
ठळक मुद्देस्कूल आॅफ स्कॉलर्सचा पुढाकार : विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने सोमवारी सायकल रॅली काढून कॅन्सर रोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
शासकीय विश्रामगृह येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, डॉ.शिवनाथ कुंभारे, आयएमए ग्लोबल कॅन्सरचे माजी अध्यक्ष डॉ.देशपांडे, अभिजीत डे, प्राचार्य निखिल तुकदेव आदींच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. इंदिरा गांधी चौैकातून राधे बिल्डींग, कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालय ते परत गांधी चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व इंदिरा गांधी चौकात पथनाट्य सादर करून कॅन्सरचे दुष्परिणाम, कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी आदींबाबत जनजागृती केली. इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सायकल रॅलीत आठवी व नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पथनाट्याचे लेखन दिलीप खोब्रागडे यांनी केले. महेंद्र बोकडे, राहुल आंबारकर, जितेंद्र गव्हारे, गीता खोकले यांनी सहकार्य केले. सायकल रॅलीत विद्यार्थी, पालक, शाळा समिती सदस्य यांनी सहभाग घेतला.
 

Web Title: Cycle Rally for Cancer Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.