जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक घेतले जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शिवाय रबी हंगामात तूर, मूग, उडीद, चणा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र अत्यल्प पावसामुळे जलसाठे आधीच कोरडे झाले. ...
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रविवार १७ मार्चला गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. याप्रसंगी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच अन्य मामल्यांची एकूण ८० प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे तड ...
दोन दिवसापूर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर १६ मार्चला शुक्रवारी एका कापड दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायऱ्या नगर परिषदने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यां ...
कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली. ...
तालुक्यातील पन्नेमारा-होचेटोला मार्गावर असणाऱ्या नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पूल बांधकामाची मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे सातत्त्याने दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या चालू वर्षातील खरीप हंगामात १५ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हाभरातील ८६ केंद्रांवरून एकूण ९ लाख २ हजार ८८२ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली असून या धानाची एकूण किंम ...
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची ...
२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता ...
राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही. ...
उन्हाळ्यात जंगलात वणवा लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर वन संपत्ती जळून खाक होते. यात अनेक जीवांचाही होरपळून मृत्यू होतो. वणव्यामुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते. ...