बाजारपेठेतील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:53 AM2019-03-18T00:53:18+5:302019-03-18T00:54:12+5:30

दोन दिवसापूर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर १६ मार्चला शुक्रवारी एका कापड दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायऱ्या नगर परिषदने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली काढून फेकले.

Market encroach deleted | बाजारपेठेतील अतिक्रमण हटविले

बाजारपेठेतील अतिक्रमण हटविले

Next
ठळक मुद्देपालिकेची दुसऱ्या दिवशी कारवाई : अतिक्रमणधारक व्यावसायिकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : दोन दिवसापूर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर १६ मार्चला शुक्रवारी एका कापड दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायऱ्या नगर परिषदने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली काढून फेकले. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकाचे धाबे दणाणले आहेत.
नगर परिषद मध्ये मालमत्ता क्रमांक ६४ म्हणुन नोंद असलेल्या तसेच मौजा देसाईगंज नझूल शहर खसरा नंबर २२ मधील प्लाट नंबर २८ क्षेत्रफळ २५०० चौ फुट तसेच नझूलच्या शासकिय जागा खसरा नंबर २३/१० एकूण क्षेत्रफळ २५०० चौ. फुट अशी एकुण ५००० चौ फुट क्षेत्रफळाची जागा आहे. या क वर्ग असलेल्या देसाईगंज नगर परीषद हद्दीत जागेवर तळघर, तळमजला अधिक प्रथम मजला, द्वितीय मजला, तृतिय मजला व चौथा मजलाचे नियमबाह्य व बेकायदेशिररित्या अनाधिकृतपणे बिनापरवानगी संरचनात्मक बांधकाम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीचे पुर्णत: उल्लंघन झाले.
याबाबत आजुबाजुच्या रहिवासी धारकांनी लेखी तक्रारी केल्या. परंतु राजकिय हस्तक्षेपामुळे यांना अवैद्य बांधकामाला अभय मिळत होते. मात्र १० मार्च २०१९ ला आदर्श आचारसंहिता लागताच शहरात झालेला अतिक्रमण काढताना राजकिय हस्तक्षेप होणार नसल्याने नगर परिषद प्रशासन मागील दोन दिवसापासून शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारुन अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम हाती घेतली असल्याचे सांगीतले जात आहे.
वारंवार सूचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरील खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर आलू, लसन, कांद्याचा दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाºया दुकानदारांवर देसाईगंज नगरपरीषदचे मुख्याधिकारी डॉ. कुलभुषन रामटेके यांनी कारवाईचा बडगा उगारुन रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाºयाविरुद्ध दोन दिवसापुर्वीच तातडीने कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. या मोहिमेने अतिक्रमणधारक हादरले आहेत.

Web Title: Market encroach deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.