गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:00 IST2025-04-07T14:59:29+5:302025-04-07T15:00:38+5:30

५० लाख रुपयांचे धान चुकारे अहेरी कार्यालयांतर्गत प्रलंबित : १३७ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.

Paddy scam worth Rs 1.5 crore in Gadchiroli! Farmers' arrears still pending | गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित

Paddy scam worth Rs 1.5 crore in Gadchiroli! Farmers' arrears still pending

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ८० केंद्रांवरून धानाची खरेदी केली जाते. मात्र हंगाम संपला तरी २०० वर शेतकऱ्यांचे जवळपास दीड कोटी रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी, धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.


दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरीप हंगामात सदर केंद्रांवर डिसेंबरपासून धान खरेदी सुरू झाली. ३१ मार्चपर्यंत बहुतांश केंद्रांवर धानाची आवक झाली. या धानाचा काटा करण्यात आला. सुरुवातीला सादर केलेल्या एक ते दोन हुंडींचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरचे लग्न, कार्यक्रम, घर बांधणे, मजुरांचे देणे, सावकाराचे कर्ज, बँकेचे कर्ज थकीत पडले आहे. आधीच शेतकऱ्यांना धानाचा योग्य मोबदला मिळत नाही. धानावर अनेक रोगांचे आक्रमण अशा परिस्थितीत निसर्गाशी झगडून न खचता शेतकरी धान पिकवतो. आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता ते आपले धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केले.


असे आहेत धानाचे चुकारे थकीत..
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० केंद्रांवरून धानाची खरेदी झाली. यापैकी १७० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात आले. अजूनही १०० शेतकऱ्यांचे ५४ लाख ७हजार ५३० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. ज्या शेतकऱ्यांचा पीएफ एमएस आयडी तयार झालेला नाही किंवा लॉट पडलेला नाही किंवा खात्यामध्ये त्रुटी आहे, अशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. २३५१.१० क्विंटल धानाचे ५४ लाख ७हजार ५३० रुपये बाकी आहे.


 

Web Title: Paddy scam worth Rs 1.5 crore in Gadchiroli! Farmers' arrears still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.