शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख क्विंटलने धान खरेदी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:12 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते.

दुष्काळाचा परिणाम : महामंडळ व संस्थांना फटकागडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते. सन २०१४-१५ वर्षाच्या खरीप हंगामाच्या तुलनेत सन २०१५-१६ या वर्षाच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे तब्बल एक लाख क्विंटलने धान खरेदी घटली. याचा फटका महामंडळ व सहकारी संस्थांना बसला. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत गतवर्षी सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात एकूण ५० धान खरेदी केंद्रावरून ४५ कोटी ३६ लाख ९६ हजार ६५० रूपये किमतीचे एकूण ३ लाख ३३ हजार ३७९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर यंदा २०१५-१६ या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत ३२ कोटी ९५ लाख ५३ हजार ३०७ रूपये किमतीच्या एकूण २ लाख ३३ हजार ७२५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात २०१५-१६ वर्षाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आपली शेतजमीन पडीक ठेवावी लागली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आपल्या शेत जमिनीला पाणी पुरवठा करून कशीबशी धानाची रोवणी केली. मात्र त्यानंतरही पावसाने दगा दिल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर सुरूवातीपासूनच धानाची दरवर्षीप्रमाणे आवक दिसून येत नव्हती. महामंडळाच्या वतीने आधारभूत किमत खरेदी योजनेचा खरीप हंगाम ३१ मार्च २०१६ रोजी संपुष्टात आणण्यात आला. या हंगामात ४१ केंद्रांवरून २ लाख ३३ हजार ७२५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावर्षी धान खरेदी घटल्यामुळे आदिवासी विविध सहकारी संस्थांचा नफा कमी झाला.