शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीबहुल मतदार संघात नोटा भारी ठरण्याची शक्यता

By admin | Updated: September 27, 2014 23:16 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात राज्यपालाच्या अधिसुचनेनंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यामुळे गैरआदिवासी मतदार कमालीचे संतप्त असून आगामी विधानसभा

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात राज्यपालाच्या अधिसुचनेनंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यामुळे गैरआदिवासी मतदार कमालीचे संतप्त असून आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मतदान करण्यापेक्षा नोटाला मतदान करण्याची तयारी त्यांनी चालविलेली आहे. त्यामुळे उमेदवारांवर व राजकीय पक्षांवर नोटा भारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्यामुळे गावांची संख्या १५०० वर पोहोचली आहे. यापैकी जवळजवळ १२०० गावात पेसा कायद्याची अंमलबजावणी होत आहे. या कायद्यामुळे वर्ग ३ आणि ४ चे सर्व पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. त्यामुळे गैरआदिवासी समुदायाचा वर्ग ३ आणि ४ च्या नोकरीचा मार्ग कायमचा बंद होणार आहे. ज्या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्याही नाही. अशाही गावांचा समावेश पेसा कायद्यात करण्यात आला आहे. राज्यपालांनी गडचिरोलीसह राज्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये हा कायदा लागू केला आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात ४७ टक्क्याच्या वर लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षणही १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात झालेल्या विविध पद भरतीत ओबीसींवर अन्याय झालेला आहे. पेसामुळे आता त्यात भर पडणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या तिनही व लोकसभेची जागाही अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. ही लोकप्रतिनिधी मंडळी आपल्या प्रश्नांबाबत लक्ष देत नाही, असा थेट जाहीर आरोप आता गैरआदिवासीकडून होऊ लागला आहे. एकमेकांना शक्ती प्रदर्शन दाखविण्याचे काम गेल्या काही महिन्यात झाले. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आदिवासी उमेदवारांना निवडून देण्याऐवजी नोटाचा वापर करून निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची तयारी अनेक गावांनी केलेली आहे. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदनही देण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक नोटाचा वापर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाला. आता मात्र हेतूपुरस्कर नोटाचा वापर करण्यासाठी गैरआदिवासी संघटना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमाही राबवित आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोरचीही डोकेदुखी वाढणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)