शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: January 24, 2016 01:15 IST

नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील सभागृहात शनिवारी ..

४० मंडळ होणार सहभागी : रविवारी बक्षीस वितरण कार्यक्रमगडचिरोली : नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील सभागृहात शनिवारी सायंकाळी ७ वाजता विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व मालार्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. किरण मडावी, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, समशेर खॉ. पठाण, न.प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, केशव दशमुखे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजन, कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावी ठरते, असे भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण मुक्तावरम, संचालन मारोतराव इचोडकर यांनी केले. या विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत जवळपास ४० मंडळ सहभागी झाल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. याप्रसंगी गौरी विठोले नागपूर येथील बाल कीर्तनकाराचे जाहीर कीर्तन रविवारी सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती आयोजक प्रवीण मुक्तावरम यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)