शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:15 IST

यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.

सर्वत्र अपुरा पाणी पुरवठा : पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त; मे महिन्यात जलसंकट आणखी तीव्र होणारदेसाईगंज : यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी देसाईगंज शहरासह संपूर्ण तालुक्यात नळाद्वारे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. देसाईगंज शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एका व्यक्तीला ७० लिटर पाण्याची गरज असते. यानुसार देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला दररोज २ कोटी ८ लाख लिटर पाणी पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. मात्र पाणी टंचाईमुळे सद्य:स्थितीत प्रती दिवस एका व्यक्तीला केवळ १० ते २० लिटर पाणी मिळत आहे. पालिकेच्या वतीने शहरवासीयांना दररोज केवळ आठ लाख लिटर पाणी नळाद्वारे दिले जात आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या वतीने जल प्राधिकरण नळ योजनेत एकूण १७ लाख ५० लिटर पाणी क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीच्या माध्यमातून दिवसातून केवळ एकदाच नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र दिवसातून दोनवेळा पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येत आहेत. नळ कुटुंबधारकांकडे पाण्याची साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने दिवसातून एकदा होणारे पाण्याची पूर्णत: साठवणूक होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेने दिवसातून दोनदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)