सर्दी, डोकेदुखीवर घेता येणार ऑनलाइन सल्ला ; ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून गरजूंना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:39 IST2025-01-30T14:38:10+5:302025-01-30T14:39:56+5:30

Gadchiroli : शहरी भागात १३ रुग्णालये सेवेत

Online consultation can be taken for colds, headaches; The needy will benefit through the e-Sanjeevani scheme | सर्दी, डोकेदुखीवर घेता येणार ऑनलाइन सल्ला ; ई संजीवनी योजनेच्या माध्यमातून गरजूंना लाभ

Online consultation can be taken for colds, headaches; The needy will benefit through the e-Sanjeevani scheme

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
विविध कारणांमुळे अलिकडे प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोकेदुखी, मळमळ, सर्दी, उलटी किंवा पोटदुखी आदी त्रास जाणवत असेल. तर ई-संजीवनी योजनेअंतर्गत ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी मोफत सल्ला मिळतो. जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास २ हजारवर रुग्णांनी ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी डॉक्टरांचा मोफत सल्ला घेतला आहे.


राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू झाली. यासाठी वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या पोर्टलवर किंवा अॅपचा उपयोग करून ऑनलाइन उपलब्ध डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओद्वारे सल्लामसलत करून रुग्ण विनामूल्य सल्ला घेऊ शकतात.


गडचिरोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात विविध रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर सेवेत कार्यरत आहेत. या डॉक्टरांची सेवा ऑनलाइनरित्या मिळते. ऑनलाइन सल्ला मिळाल्यानंतर औषधोपचार केला जातो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


या विभागाची मिळते रूग्णांना सेवा
ई- संजीवनी ओपीडी मार्फत दंतरोग, त्वचा रोग, शल्यचिकित्सा, मानसिक रोग, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग आदी तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी सुविधा दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १.४५ ते ५ वाजेपर्यंत सुरू असते. या वेळेत ऑनलाईन सल्ला मिळतो.


नोंदणी कशी करणार ?
मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून ई-सजीवनी अॅप डाउनलोड करा, हे अॅप वापरण्यासाठी फोन नंबर लागेल, यामध्ये लॉगिनसाठी काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेशंट रजिस्ट्रेशन / जनरेट टोकन, पेशंट लॉगिन आणि पेशंट प्रोफाइल इत्यादी पर्याय दिसतील. रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, व्यवस्थापन, वैद्यकीय कर्मचा-यांशी डॉक्टरांशी ऑडिओ व्हिडीओ सल्लामसलत, ई-उपचार, एसएमस ई-मेल नोटिफिकेशन, डॉक्टरांद्वारे मोफत सेवा, सर्व माहिती डॉक्टर्स, रुग्णालय यांची संख्या आदीबाबत माहिती मिळते.


तज्ज्ञ डॉक्टराकडून सल्ला
एमबीबीएस, एमडी, एमएस, आयुर्वेदिक आदी तज्ज्ञ डॉक्टरच्या उपलब्धतेनुसार रुग्णांना आजारासंदर्भात हा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मिळतो. संबंधित डॉक्टर ऑनलाइन औषधांचे प्रिस्क्रीप्शनही देतात.


५२ बीपी, शुगरचे रूग्ण घेतात अधिक सल्ला
प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आहेत. याशिवाय उपकेंद्र, आरोग्य पथक आहेत. या भागातील ग्रामीण नागरिक प्रत्यक्ष जाऊन येथे सेवा घेतात. येथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी ई-संजीवनी योजना महत्त्वपूर्ण ठरते.

Web Title: Online consultation can be taken for colds, headaches; The needy will benefit through the e-Sanjeevani scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.