शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

इतलचेरूतील कोंबडा बाजारावर धाड

By admin | Updated: March 16, 2015 01:10 IST

येथून १५ किमी अंतरावर असलेल्या इतलचेरू येथील कोंबडा बाजारावर अहेरी पोलिसांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली.

अहेरी : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या इतलचेरू येथील कोंबडा बाजारावर अहेरी पोलिसांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली. या धाडेत पाच जणांना अटक करून कोंबडे, दुचाकी व काही रक्कम जप्त केली आहे. पाउलत गोविंदराव मडावी (४८), तुळशीराम दसरू आत्राम (३५) दोघेही रा. खमनचेरू, लिंगा दुर्गा तलांडी (५०) रा. टेकुलगुडा, महादेव वसंत आलाम (२४) रा. राजारामखांदला, सतिश चंद्रा आत्राम (२७) रा. तानबोडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. इतलचेरू येथे कोंबडा बाजार सुरू असून या कोंबडा बाजारात हजारो रूपयांचा जुगार खेळला जात आहे, अशी माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली. या धाडेत पाच जणांना अटक केली. त्याचबरोबर पाच कोंबडे व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक फिरोज मुलानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संजय अलमवार, रमेश आत्राम, सुरेश ताराम, बळीराम आळे, संजय बोलुवार, होमगार्ड राजेश झाडे, इंदरशहा गावडे यांनी केली. या धाडीमुळे अहेरी परिसरातील कोंबडा शौकीनांमध्ये धडकी भरली आहे. (शहर प्रतिनिधी)