यावर्षीच्या पोलीस पदभरतीत ओबीसींना सर्वाधिक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 11:43 PM2022-11-12T23:43:33+5:302022-11-12T23:51:23+5:30

गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. या भरतीच्या अनुषंगाने सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.

OBCs get maximum seats in this year's police recruitment | यावर्षीच्या पोलीस पदभरतीत ओबीसींना सर्वाधिक जागा

यावर्षीच्या पोलीस पदभरतीत ओबीसींना सर्वाधिक जागा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महाराष्ट्र पाेलिस शिपाई  नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळाेवेळी आणि २३  जून २०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणेनुसार गडचिराेली पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर सन २०२२ मध्ये पाेलिस शिपाई पदाच्या ३४८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीत इतर मागासवर्गीयांच्या सर्वाधिक १९० जागा आहेत. त्याखालाेखाल अनुसूचित जमातीच्या ११० जागा आहेत. ऑनलाइन आवेदन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांकडून लगबग वाढली आहे.
गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. या भरतीच्या अनुषंगाने सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले हाेते. भरती प्रक्रियेच्या जाहिराती निघाल्या असून या प्रक्रियेला वेग आला आहे.
 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही. 
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे जिल्हा पाेलीस विभागाने स्पष्ट केले आहे. पाेलिस भरती प्रक्रिया पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या नेतृत्वात हाेणार आहे. पाेलिस शिपायांची ३४८ तर चालकांच्या १६० जागा भरल्या जाणार आहेत. हा अर्ज पाेलिस विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

तहसीलदारांकडील वास्तव्याचा दाखला आवश्यक

महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दि. २३ मार्च, २०१८ अन्वये पाेलिस भरतीतील उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. या लेखी परीक्षेमध्ये ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असून हे गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाही. 
महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दि. २३ मार्च, २०१८ अन्वये गडचिरोली जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलिस भरतीमध्ये भाग घेता येईल. या उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदारांनी दिलेला वास्तव्याचा दाखला जोडणे आवश्यक राहील, असे पाेलिस विभागाने नमूद केले आहे.

शारीरिक चाचणी सरावाला वेग
पाेलिस शिपाई पद भरतीसाठी लेखी परीक्षेसाेबतच शारीरिक चाचणीत चांगले गुण असणे आवश्यक आहे. दाेन्ही परीक्षेतील मूल्यांकन व प्राप्त गुणांनुसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर हाेत असते. युवक, युवती  व बहुतांश उमेदवार या दाेन्ही परीक्षांची तयारी करीत आहेत. सध्या हिवाळा असून पहाटेच्या सुमारास प्रमुख मार्ग व जिल्हा स्टेडियमवर शारीरिक चाचणीचा सराव करीत आहेत. पहाटेपासून सकाळपर्यंत स्टेडियमवर पाेलिस भरतीत उतरणाऱ्या उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे.

 

Web Title: OBCs get maximum seats in this year's police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस