शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

छत उडालेल्या गोदामात ठेवला पोषण आहार

By admin | Updated: June 8, 2015 02:08 IST

अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा पोषण आहार पंचायत समितीच्या छत उडालेल्या गोदामात ठेवण्यात आला आहे.

खराब होण्याची शक्यता : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
प्रतीक मुधोळकर  अहेरी
अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा पोषण आहार पंचायत समितीच्या छत उडालेल्या गोदामात ठेवण्यात आला आहे. परिणामी पावसाचे पाणी या पोषण आहारावर पडून सदर पोषण आहार खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
लहान बालकांना अंगणवाडीमध्ये येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर त्यांना पोषण आहार प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाकडून सकस आहारांतर्गत खाद्य पदार्थ पुरविले जातात. सदर खाद्य पदार्थ सर्वप्रथम पंचायत समितीस्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाला उपलब्ध होतात. त्यानंतर त्याचे वितरण प्रत्येक अंगणवाडी स्तरावर करण्यात येते.
अहेरी पंचायत समितीला २९ मे रोजी शेकडो बॉक्स चिक्की (खाद्य पदार्थ) उपलब्ध झाली. सदर चिक्की अंगणवाडीस्तरावर वितरणाचे काम सुरू आहे. तोपर्यंत सदर चिक्की एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आली आहे. सदर गोदाम कौलारू असून काही खोल्यांमधील कवेलु फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी गोदामाच्या खोलीमध्येच पडते. याच खोल्यांमध्ये चिक्की ठेवण्यात आली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून अधुनमधुन पाऊस पडत आहे. पावसाचे फवारे चिक्कीच्या बॉक्सवर पडत आहेत. पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. कधीही मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा पाऊस झाल्यास हे संपूर्ण चिक्कीचे डब्बे पावसाच्या पाण्याने ओलेचिंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिक्की ही साखर व शेंगदाण्यापासून बनली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या बॉक्समध्ये गेल्यास संपूर्ण चिक्की खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या बॉक्सला मुंग्या लागून ते खराब होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी हे संपूर्ण बॉक्स ठेवण्यात आले आहेत, त्याच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा कचरा पसरला आहे. यातील किटक चिक्कीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोदाममध्ये ठेवण्यात आलेली चिक्की २९ मे रोजी प्राप्त झाली आहे. १९७ बॉक्सपैकी ८० बॉक्सचे वितरणही अंगणवाड्यांना झाले आहे. सद्य:स्थितीत चिक्कीचे बॉक्स चांगले आहेत. मात्र जोरदार पाऊस झाल्यास सदर चिक्की खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुले व गरोदर माताना देण्यात चांगला आहार मिळावा यासाठी आम्ही नेहमीच दक्ष राहतो. इमारत दुरूस्तीसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अजुनपर्यंत सदर इमारतीच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.
- आर. डी. मेश्राम, बाल विकास प्रकल्प अधिकारी अहेरी
कुलूप नसलेले गोदाम
ज्या गोदामामध्ये चिक्की ठेवण्यात आली आहे, त्या गोदामाला कुलूप नाही. या गोदामाचा मुख्य दरवाजा तुटला आहे. त्यामुळे कोणताही नागरिक या गोदामामध्ये सहज प्रवेश करून सदर बॉक्स चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर छतावरूनही या गोदामामध्ये सहज प्रवेश करता येते.
गोदाम दुरूस्तीकडे दुर्लक्ष
जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. या निधीतून सदर गोदामाची दुरूस्ती किंवा नवीन गोदामाचे बांधकाम सहज शक्य आहे. मात्र येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य व अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गोदाम दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.