शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएचएमची कंत्राटी पदे आरक्षणानुसार भरणार

By admin | Updated: July 10, 2015 02:03 IST

उमेदवारांचे शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय आदी बाबतच्या पात्रता तपासून गुणवत्तेनुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य ...

कंत्राटी पदांना प्रथमच सामाजिक आरक्षण लागू : सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
गडचिरोली : उमेदवारांचे शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय आदी बाबतच्या पात्रता तपासून गुणवत्तेनुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध स्वरूपाचे रिक्त पदे भरण्यात येत होती. मात्र आता एनआरएचएमची सर्व रिक्त पदे सामाजिक आरक्षणानुसार भरण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित करून एनआरएचएमच्या कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे आता एनआरएचएमची सर्व कंत्राटी पदे सामाजिक आरक्षणानुसार भरली जाणार आहे. राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित करण्यात आली असून या अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रक/प्रतिबंधक कार्यक्रम या योजनांचा समावेश होतो. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानास २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीकरिता १३ टक्के, अनुसूचित जमातीकरिता सात टक्के, विमुक्त जाती अ साठी तीन टक्के, भटक्या जमाती ब ३.५ टक्के, भटक्या जमाती ड दोन टक्के, विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के व ओबीसी प्रवर्गासाठी १९ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.