गडचिरोलीत नऊ विदेशी तबलिगी नागरिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:48 AM2020-04-30T09:48:07+5:302020-04-30T09:49:00+5:30

कझाकिस्तान आणि किरगिस्तान या देशातून आलेल्या ५ तबलिगी जमातीच्या लोकांना बुधवारी (दि.२९) गडचिरोली पोलिसांनी अटक केली. विदेशी नागरी अधिनियमाचा भंग आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरूद्ध गेल्या ५ एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले होते.

Nine foreign Tablighi nationals arrested in Gadchiroli | गडचिरोलीत नऊ विदेशी तबलिगी नागरिकांना अटक

गडचिरोलीत नऊ विदेशी तबलिगी नागरिकांना अटक

Next
ठळक मुद्देचंद्रपूर कारागृहात रवानगीस्वॅब नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कझाकिस्तान आणि किरगिस्तान या देशातून आलेल्या ५ तबलिगी जमातीच्या लोकांना बुधवारी (दि.२९) गडचिरोली पोलिसांनी अटक केली. विदेशी नागरी अधिनियमाचा भंग आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरूद्ध गेल्या ५ एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यामुळे त्यांची रवानगी दि.२९ ला चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
कझाकिस्तानचे ५ आणि किरगिस्तानचे ४ असे ९ लोक ११ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात आले होते. ते दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा असला तरी त्यांनी विदेशी नागरी अधिनियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवत गडचिरोली पोलिसांनी ५ एप्रिल रोजी त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम २७९, २७०, १८८, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि विदेशी नागरी अधिनियम १९४६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वॉरंटाईन केले होते.
यादरम्यान त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.
आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. असे असताना एकाचवेळी ९ विदेशी नागरिक आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. पण त्या ९ लोकांचे नमुने निगेटिव्ह निघाल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर करीत आहे.

Web Title: Nine foreign Tablighi nationals arrested in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.