शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही हातभट्ट्यांवर धाडसत्र

By admin | Updated: September 18, 2014 23:36 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूभट्ट्यांवर सुरू केलेल्या धाडसत्रात दुसऱ्या दिवशीही दोन भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गोंदियाच्या पथकाने यशस्वी केली.

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूभट्ट्यांवर सुरू केलेल्या धाडसत्रात दुसऱ्या दिवशीही दोन भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गोंदियाच्या पथकाने यशस्वी केली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या भट्टीचा चालक पसार झाला.निवडणुकीदरम्यान अवैधपणे मद्यवाटप करण्यासाठी तसेच प्रचाराच्या कामात येणाऱ्या लोकांसाठी मद्याची व्यवस्था अनेक उमेदवार करीत असतात. याला आळा घालून निकोप वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात बुधवारपासून धाडसत्र सुरू करण्यात आले. बुधवारी जिल्ह्यातील विविध निरीक्षकांच्या पथकांसह भरारी पथकांनी भाग घेऊन ८ हातभट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. गुरूवारी गोंदियाचे निरीक्षक सुरेश डोंगरे यांच्यासह त्यांचे सहकारी छगन हुमे, राजेश ढाले, सुनील ढोमणे, वाहनचालक सोनबरसे यांनी ओजीटोला शिवाराच्या नाल्याच्या काठाने लावलेल्या दोन भट्ट्या पकडल्या. यावेळी दुर्गाप्रसाद राधेलाल लांजेवार (रा.चुटीया) याला अटक करण्यात आली तर नरवीर हरिलाल उईके (रा.ओजीटोला) हा फरार झाला. गुरूवारच्या कारवाईत ५८ लिटर मोहा दारू आणि ८०० लिटर मोहा सडवा असा एकूण २३ हजार ४२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.