शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीची नवी शक्कल

By admin | Updated: July 19, 2014 23:54 IST

संगणकीय विद्युत मीटर लावल्यानंतर विद्युत चोरीचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वीज चोरट्यांनी आता विद्युत मीटरच्या बाहेर परस्पर वायर जोडून त्याच्या

देसाईगंज : संगणकीय विद्युत मीटर लावल्यानंतर विद्युत चोरीचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वीज चोरट्यांनी आता विद्युत मीटरच्या बाहेर परस्पर वायर जोडून त्याच्या माध्यमातून वीज चोरी सुरू केली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. घरातील बहुतांश साधने विद्युतवर चालतात. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारानंतर वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला कमी प्रमाणात महसूल गोळा होत असल्याने वीज चोरी ही वीज वितरण कंपनीसाठी फार मोठी व जुनी समस्या आहे. वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीने अनेक उपाय योजले असले तरी वीज चोरीवर पूर्णपणे आळा घालण्यात वीज वितरण कंपनीला अजूनपर्यंत तरी यश प्राप्त झाले नाही. पाच वर्षांपूर्वी चक्र असलेले वीज मीटर होते. या मीटरमधून वीजेची चोरी अगदी सहजपणे करता येत होती. अनेकांचे मीटर घरात असल्याने त्याकडे लक्ष देणेही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने संगणकाप्रमाणे असलेले अगदी पारदर्शक मीटर सध्या शहरी भागात लावण्यात आले आहेत. या या मीटरच्या आतील सर्वच बाबी अगदी स्पष्टपणे दिसत असल्याने या मीटरच्या सहाय्याने चोरी करणे शक्यच नाही, असा विश्वास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र वीज चोरट्यांनी त्यावरही उपाय शोधून काढला आहे. विद्युत खांबापासून मीटरपर्यंत वायर जोडण्यात येतो. त्यानंतर घरामध्ये विद्युतचा पुरवठा करण्यात येतो. घरात वापरण्यात येणारी वीज मीटरमधूनच जात असल्याने जेवढे युनिट वापरले जातात. तेवढ्यांची नोंद घेतल्या जाते. मात्र वीज चोरट्यांनी विद्युत खांबापासून आलेल्या वायरला मीटरच्या बाहेरून एक स्वतंत्र वायर टाकून सदर वायर घरच्या मुख्य वायरला जोडण्यात आला आहे. यामुळे घरात वापरण्यात आलेल्या विजेची विद्युत मीटरमध्ये नोंद होत नाही. वीज चोरी एकदम लक्षात येऊ नये यासाठी काही दिवस हा वायर काढून टाकला जातो. त्यामुळे काही युनिटची नोंद घेतल्या जाते. वीज चोरट्यांचा हा नवीन फंडा बहुतांश वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहित आहे. हे प्रकार विजेचा जास्त वापर करणाऱ्या नागरिकांकडून किंवा गृह उद्योगांमध्ये सर्रास सुरू आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे महिन्याकाठी कोट्यवधी रूपयाचे नुकसान होत आहे. याकडे वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)