शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकीचे वाजले पडघम

By admin | Updated: March 11, 2015 00:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यात संघटन मजबूत झाले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीचे काम जोमात करावे, असे आवाहन...

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यात संघटन मजबूत झाले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीचे काम जोमात करावे, असे आवाहन पक्षाचे गडचिरोली जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र वैद्य यांनी केले.येथील कॉम्प्लेक्स परिसरातील विश्रामगृहात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक माजी राज्यमंत्री तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या सुरूवातीला गडचिरोलीचे माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना मौन श्रध्दांजली वाहण्यात आली. सन २०१५ ते २०१७ या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात प्राथमिक व क्रीयाशिल सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. या नोंदणीनंतर येत्या सात-आठ दिवसात नवे तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याची नवी कार्यकारीणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र वैद्य यांनी बैठकीत दिली. बैठकीला राकाँचे प्रदेश सदस्य सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, सरचिटणीस शाम धाईत, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, बाबा हाशमी, युवा नेते ऋतूराज हलगेकर, धानोराचे तालुकाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री, जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, रविंद्र वासेकर, अरूण हरडे, विवेक बाबनवाडे, मंदीप गोरडवार, लिलाधर भरडकर, संदीप ठाकूर, ज्योती सोनकुसरे, अजय कुंभारे, इरफान खान, विजय धकाते आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका शांततेच्या वातावरणात बिनविरोध पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्य यांनी केले.