गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 11:06 IST2018-07-08T11:05:46+5:302018-07-08T11:06:20+5:30

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे.

Naxalites killed one innocent in Gadchiroli | गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

एटापल्ली (गडचिरोली) - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्यातील सोनभट्टी गावातील शनिवारी (7 जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जारावंडी उप-पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनभट्टी या गावातील इसरू पोटावी याला जवळपास15-20 नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेले. तिथेच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळच्या रस्त्यावर आणून टाकला. मृतदेहासोबत एक चिठ्ठीदेखील सोडली होती. या चिठ्ठीमध्ये पोलिसांचा खबऱ्या असल्याने इसरू पोटावीची हत्या करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रविवारी सकाळी रस्त्यावर इसरू पोटावीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

 

Web Title: Naxalites killed one innocent in Gadchiroli