शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे अतिक्रमण चार दिवसात हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना  अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ सी च्या राजमार्गाच्या  जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना २४ मे च्या आत कब्जा हटविण्याची सूचना दिली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कच्चे व पक्के अतिक्रमण हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने हालचाली वाढविल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज येथील अतिक्रमणधारकांना शुक्रवारी नोटीस बजावत चार दिवसांत अतिक्रमण हटविण्यास सांगितले. ते न हटविल्यास बुलडोझर लावून अतिक्रमण हटविले जाण्याची शक्यता आहे. साकोली-वडसा-आरमोरी या ३५३ सी राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांसह लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना  अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ सी च्या राजमार्गाच्या  जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना २४ मे च्या आत कब्जा हटविण्याची सूचना दिली आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र.१४ नागपूर येथे आपल्या जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी नागरिकांना दिली जाणार आहे. अशा अभिवेदनधारकांची २३ मे ला पूर्ण सुनावणी करण्यात येणार  आहे. या नोटीसचे अनुपालन करण्यात अयशस्वी ठरल्यास अतिक्रमण काढले जाणार आहे.  

नगर परिषदही हटविणार अतिक्रमण -    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३५३ सी मधील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असतानाच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या आदेशानुसार रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी लाऊडस्पीकरद्वारा शहराच्या मुख्य बाजारात गाडी फिरवून आवाहन करण्यात आले. -    अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या अजगरी विळख्यात सापडलेले देसाईगंज शहर लवकरच अतिक्रमणमुक्त होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण