तेंदू विक्रीतून नागेपल्लीला १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

By Admin | Updated: April 3, 2017 02:25 IST2017-04-03T02:25:31+5:302017-04-03T02:25:31+5:30

पेसा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नागेपल्ली येथे तेंदूचे लिलाव प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली.

Naghepalli produces Rs.14.4 million from tendu sale | तेंदू विक्रीतून नागेपल्लीला १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

तेंदू विक्रीतून नागेपल्लीला १ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

 लिलाव पार पडला : १३ हजार ५५० रूपये मिळाला भाव
आलापल्ली : पेसा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नागेपल्ली येथे तेंदूचे लिलाव प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली. तेंदू विक्रीच्या माध्यमातून नागेपल्ली ग्रामसभेला १ कोटी ८४ लाख ९५ हजार ७५० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
तेंदूपत्त्याच्या लिलावासाठी १ एप्रिल रोजी स्वतंत्र ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी अशोक रोपल्लीवार होते. लिलाव प्रक्रियेत एकूण ११ कंत्राटदारांनी सहभाग घेतला. सिताराम ट्रेडिंग कंपनी गोंदियाने सर्वाधिक १३ हजार ५५० रूपयांची बोली लावली. त्यामुळे सदर कंत्राटदाराला तेंदू संकलन करण्याचा अधिकार देण्यात आला. लिलाव प्रक्रियेदरम्यान पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, उपसभापती राकेश तलांडे, पं.स. सदस्य योगेश्वर मोहुर्ले यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी रामटेके यांनी हजेरी लावली. लिलावी संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास अधिकारी ए. व्ही. उंदीरवाडे यांनी पार पाडली. नागेपल्लीच्या परिसरातून एकूण १ हजार ३६५ गोणी तेंदूपत्ता संकलन होणार आहे. प्रत्येक गोणीला १३ हजार ५५० रूपये भाव मिळाला आहे. त्यामुळे या गावाला एकूण १ कोटी ८४ लाख ९५ हजार ७५० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. मागील वर्षी या ग्रामपंचायतीला केवळ ३० लाख ५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Naghepalli produces Rs.14.4 million from tendu sale