शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या जागेवर नगरपरिषदेचे सार्वजनिक शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

आरमाेरी : येथील जुन्या बसस्थानक जवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली महसूल विभागाची जागा नगरपरिषदेला हस्तांतरित झाली नसतानाही, या ...

आरमाेरी : येथील जुन्या बसस्थानक जवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली महसूल विभागाची जागा नगरपरिषदेला हस्तांतरित झाली नसतानाही, या जागेवर नगरपरिषदेने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले आहे. अतिशय महत्त्वाची जागा शौचालयाच्या बांधकामात गुंतविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आरमोरी शहराच्या मध्यभागी जुन्या बस स्थानकाजवळ रस्त्याला लागून बोडीची जागा आहे. ही जागा महसूल विभागाची आहे. आरमोरीत ग्रामपंचायत अस्तित्वात होती, तेव्हापासून महसूल विभागाकडे या जागेची मागणी केली जात होती. त्यानंतर, नगरपंचायत व नगरपरिषदेनेही या जागेची मागणी केली. मात्र, अद्यापही ही जागा नगरपरिषदेला हस्तांतरित झाली नाही. बोडीच्या एका बाजूची जागा आरमोरी तालुका पत्रकार संघाने मागितली असून, आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून त्यांबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. ही जागा अतिशय महत्त्वाची असल्याने भविष्यात चांगल्या कामासाठी किवा कार्यालय व गाळ्याचे बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेला जागा हस्तांतरित झाल्यावर उपयोगात आणता येऊ शकत हाेती. भविष्यात त्या ठिकाणी शौचालयाऐवजी गाळ्याचे बांधकाम केले, तर नगरपरिषदेला महिन्याकाठी बरेच उत्पन्न मिळाले असते. मात्र, नगरपरिषदेला मिळालेल्या निधीचा आवश्यक कामांवर खर्च करण्याऐवजी लाखोंचे सार्वजनिक शौचालय बांधून निधीची उधळपट्टी करण्याचा हा प्रकार आहे, असा आराेप हाेत आहे. वास्तविक, बस स्थानकाजवळ जुने मुतारीघर असताना एवढे महागडे शौचालय बांधण्याची गरज काय? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. जागा नगरपरिषदेला हस्तांतरित होण्याच्या अगोदरच नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले सुपीक डोके वापरून लाखमोलाच्या जागेवर समोरच सार्वजनिक शौचालय व मुतारी घराचे बांधकाम केले. शाैचालय बांधकामामुळे परिसरातील जागेचे मूल्य घसरले आहे.

बाॅक्स...

मूलभूत प्रश्नांना दिली बगल

आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात मध्यभागी असलेली बोडीची जागा केव्हाही चांगल्या कामाकरिता उपयोगात आणता आली असती. जागा हस्तांतरित झाली नसताना बांधकाम करण्याची घाई का? निधी खर्च करण्यासाठी की, कंत्राटदारांच्या फायद्यासाठी घाईगडबडीने चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले काय? जुने मुतारी घर व शौचालय लागून असताना, जवळपास शौचालय व मुतारी घर बांधकाम करणे गरजेचे होते काय? शहरातील अनेक भागात रस्ते, नाल्या, पूल, पाण्याची सुविधा करणे आवश्यक असताना, मूलभूत प्रश्नांना बगल देत, त्या भागात निधी खर्च न करता, महागडे सार्वजनिक शौचालय बांधकाम करून निधीची उधळपट्टी काय? करण्यात येत आहे, महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली का, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत.

कोट

नगरपरिषदेच्या हद्दीत हा परिसर येत असल्यामुळे व जुन्या बसस्थानकाजवळ ये-जा करणाऱ्या प्रवाशांची हयगय होत असल्यामुळे, तेथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. ते ठिकाण बस स्थानकाचे असल्यामुळे शासनाच्या निधीतून काम करण्यात आले आहे.

पवन नारनवरे, नगराध्यक्ष आरमोरी