A miniature reversal slowed traffic on the Armory Road | मिनीट्रक उलटल्याने आरमोरी मार्गावरील वाहतूक खोळंबली
मिनीट्रक उलटल्याने आरमोरी मार्गावरील वाहतूक खोळंबली

ठळक मुद्देकिराणा सामानाचे नुकसान : ओव्हरटेक करताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नागपूरवरून किराणा सामान गडचिरोलीकडे घेऊन येणारा मिनीट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. सदर अपघात आरमोरी मार्गावरील पटवारी भवन इमारतीजवळ सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडला.
एमएच ३३ जी २०९२ क्रमांकाचा मिनीट्रक भरधाव वेगाने गडचिरोली शहरातून जात होता. दुसऱ्या वाहनाला ओलांडताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्ता दुभाजकाला धडकले. वाहनाच्या धडकेने रस्ता दुभाजकावर असलेला पथदिव्याचे खांब वाकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन उलटल्याने वाहनामधील किराणाचे सामान अस्ताव्यस्त पडले. सदर सामान गडचिरोली येथील किराणा दुकानदाराचे असल्याची माहिती आहे. वाहन रस्त्यावरच उलटल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: A miniature reversal slowed traffic on the Armory Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.