शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट विहीर बांधकामाने लाखो रूपये पाण्यात

By admin | Updated: May 7, 2016 00:17 IST

राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील....

एटापल्ली तालुक्यातील स्थिती : बांडे, झारेवाडा व परसलगोंदी येथील विहिरी ठरल्या आहेत बेकामीरवी रामगुंडेवार  एटापल्लीराष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र यातील अनेक विहिरींचे बांधकाम अर्धवटच राहिले आहे. तर काही विहिरी तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. तर काही विहिरींसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. त्यामुळे या विहिरी निकामी ठरल्या असून लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.ग्रामपंचायत परसलगोंदीत समाविष्ट असलेल्या बांडेगावात तीन वर्षांपूर्वी सहा लाख रूपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीची तोंडी उंच करण्यात आली आहे. विहिरीतून पाणी काढतेवेळी सांडलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विहिरीच्या सभोवताल सिमेंटचा गोलाकार कठडा बनविणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचा कठडा बनविण्यात आला नाही. तोंडी उंच असल्यामुळे हातही पूरत नाही. विहिरीच्या सभोवताल प्लास्टरसुध्दा करण्यात आले नाही. पाणी काढता येत नसल्याने सदर विहीर बेकामी झाली आहे. कसनसूर परिसरातील जवेली खुर्द अंतर्गत पिपली बुर्गी या गावात एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. या विहिरीचे बांधकाम सुध्दा अर्धवटच राहिले आहे. फक्त मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या विहिरीत सभोवतालचे पाणी साचत असल्याने सदर पाणी आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तोंडी बांधण्यात आली नसल्याने मुले खेळताना अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत झारेवाडा गावात निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. एक वर्षाच्या कालावधीतच चबुतरा पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या विहिरीचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप झारेवाडा येथील नागरिकांनी केला आहे. एटापल्ली तालुक्यात बारमाही वाहणारी बांडे नदी आहे. तसेच अनेक लहान-मोठे तलाव आहेत. पाण्याची पातळी चांगली असतानाही विहिरींअभावी पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे.