शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवायच सर्रास मिळते औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क (रिॲलिटी चेक) गडचिराेली : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटीचे पालन न करता आपल्या मनमर्जीने औषधांची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क (रिॲलिटी चेक)

गडचिराेली : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटीचे पालन न करता आपल्या मनमर्जीने औषधांची विक्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील परवानाप्राप्त औषधी दुकाने व संबंधित दुकानदारांच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचे काम औषध प्रशासनाची यंत्रणा करीत असते. मात्र या यंत्रणेकडून जिल्ह्यात औषधी दुकानांची तपासणीच होत नाही. त्यामुळे कारवाई तर दूरच राहिली, अशी स्थिती प्रत्यक्षात पाहणी केली असता दिसून आली.

औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सनी औषधसाठ्याची उपलब्धता किती आहे, याचे विवरण, खरेदी-विक्रीचे रेकाॅर्ड अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकू नये असाही अन्न व औषध विभागाचा नियम आहे. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्याच नियमांचा विसर पडल्यामुळे कोण नियमांची अंमलबजावणी करतो, कोण नाही याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष आहे.

गडचिराेली शहरासह जिल्ह्यात शेकडाे औषधी दुकाने आहेत. जिल्हास्तरापासून तालुकास्तर तसेच माेठ्या गावांमध्ये आणि प्राथमिक आराेग्य केंद्र असलेल्या गावांमध्ये परवानाधारकांचे औषधी दुकाने आहेत. या सर्व दुकानांमधून औषधांची विक्री सुरू आहे. काेराेना संकटाच्या काळात औषध विक्रेत्यांना संबंधित औषधी विकण्यासाठी नियम घालून देण्यात आले आहेत. ज्यावेळी काेराेनाची लाट अधिक हाेती, त्यावेळी कडक निर्बंध हाेते. अशावेळी अनेक औषधी दुकानात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला हाेता.

(बॉक्स)

अनेक ठिकाणी मिळते चिठ्ठीशिवाय औषधी

शहरातील काही मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळते का, याची तपासणी केली असता बहुतांश ठिकाणी ग्राहकांनी मागितलेली औषधी दिली जात असल्याचे दिसून आले. यात मुख्य मार्केटमधील, चामोर्शी मार्गावरील आणि इतरही भागातील मेडिकल स्टोअर्सचा समावेश होता. ग्राहकांनाही छोट्या कारणासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे जाऊन औषधी लिहून आणणे परवडणारे नसल्यामुळे अनेकजण विनाचिठ्ठी औषधी घेतात.

बाॅक्स...

काही औषध विक्रेते बिल देत नाही

डाॅक्टरांच्या चिठ्ठीनुसार रुग्ण व किंवा त्याच्या नातेवाइकाला परवानाधारक औषधी दुकानदार औषधांची विक्री करतात. बहुतांश विक्रेते औषधांचे पक्के संगणकीकृत बिल देतात. मात्र काही औषध विक्रेते खरेदी केलेल्या औषधांचे बिल रुग्णाला देत नाही. अन्न व औषध प्रशासनाने सर्व औषध विक्रेत्यांना पक्के बिल देण्याची सूचना करावी, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स...

सर्दी, अंगदुखीसाठी डाॅक्टरांकडे काेण जाणार?

सध्या पावसाळा सुरू असून, काेराेनाची ओसरती लाट आहे. काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी डाॅक्टरांकडे गेल्यावर किंवा सरकारी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी गेल्यावर काेराेनाची चाचणी करण्यास सांगितले जाते. हलका ताप, सर्दी, अंगदुखीसाठी काेराेना चाचणी करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तयार हाेत नाही. त्यामुळे सर्दी, अंगदुखी असणारे अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक डाॅक्टरांकडे न जाता औषधी दुकानात जाऊन खरेदी करतात. दाेन ते तीन दिवस औषधी घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्यानंतर ते डाॅक्टरांकडे जातात.

बॉक्स

जिल्हाभराचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर

यासंदर्भात औषध प्रशासन विभागाचे प्रभारी निरीक्षक एन.व्ही. लोहकरे यांना फोन केला असता त्यांनी कॉल स्वीकारलाच नाही. जिल्ह्यात या विभागाकडे एकही स्थायी अधिकारी नाही. लोहकरे हे नागपूर येथे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे गडचिरोलीचे सहायक आयुक्त आणि निरीक्षक असे दोन्ही प्रभार आहे. नागपूरचा व्याप सांभाळून संपूर्ण गडचिरोली जिल्हा एक अधिकारी कसे सांभाळणार? याचा विचार या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नसेल तर ही बाब आश्चर्याची आहे.