Corona Vaccination: अनेक अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:16 AM2021-06-14T06:16:35+5:302021-06-14T06:16:48+5:30

गडचिरोलीत आतापर्यंत अवघी १६ टक्के उद्दिष्टपूर्ती. काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली.

Many rumors are circulating about vaccinations in remote areas | Corona Vaccination: अनेक अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

Corona Vaccination: अनेक अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती व्हावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे एक ना अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

काेराेनासारख्या महामारी यापूर्वीही आल्या. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन आदिवासींनी महामारीवर मात केली. आजही हा काढा पित असल्याने आम्हाला काेराेना हाेऊ शकत नाही. त्यामुळे लस घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगत वयाेवृद्ध नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत. त्यांचे अनुकरण इतर लोक करत आहेत.

कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्याच्या 
छत्तीसगड सीमेकडील गावांमध्ये गैरसमजाचे प्रमाण जास्त आहेत. 
१२ जूनपर्यंत काेरची तालुक्यातील केवळ ३ हजार ९८९, भामरागड तालुक्यात ४ हजार ३६८ 
नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यांचा विस्तार व लाेकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अतिशय 
कमी आहे.

कोविडच्या साथीवर विजय मिळवण्याचा सर्वांत प्रभावी उपाय लस आहे. हा विज्ञानाचा चमत्कार की नवा रोग आल्यावर वर्षभरात त्यावर लस उपलब्ध झाली आहे. नवा उपाय स्वीकारायला समाज सहसा बराच काळ घेतो. पण या वेळेस आपण वेळ दवडता कामा नये. जो लस घेईल तो स्वतःचे रक्षण करेल व इतरांचेही.
- डाॅ अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक

आराेग्य कर्मचारी येताच दरवाजे हाेतात बंद
nप्रशासनामार्फत दुर्गम भागातील 
नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र लसविषयीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली असल्याने नागरिक पुढे येत नाही. 
nगावात आराेग्य कर्मचारी आल्याचे माहीत हाेताच नागरिक दरवाजे बंद करून घरात लपून बसतात किंवा शेतावर निघून जातात.

हे आहेत 
विविध गैरसमज

nवनस्पतींचा काढा पीत असल्याने लसची गरज नाही.
nयापूर्वी अनेक महामाऱ्या बघितल्या आहेत.
nलसीच्या नावाने काेराेना चाचणी केली जाते.
nकाेराेनाच्या नावाने गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती करून किडनी काढली जाते.
nसरकार लाेकसंख्या कमी करण्यासाठी लस देऊन मारणार आहे.
nमेल्यानंतर मृतदेह परस्पर जाळून टाकल्या जाते.
nशरीर कमजाेर हाेते.
nलसने अनेक दिवस ताप येते. नंतर मृत्यू हाेतेे.
nपुढे मुलबाळ हाेत नाही.

Web Title: Many rumors are circulating about vaccinations in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.