शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापनाच्या मतभेदामुळे वेतन रखडले

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

गडचिरोली नजीकच्या नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थायी प्राध्यापक व शिक्षकेत्तर ...

शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर : प्राध्यापक पाचव्या दिवशीही संपावरगडचिरोली : गडचिरोली नजीकच्या नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थायी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यापासूनचे वेतन व्यवस्थापनाच्या आपसी मतभेदामुळे रखडले आहे, अशी माहिती या महाविद्यालयाच्या अन्यायग्रस्त प्राध्यापकांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. २२ फेब्रुवारीपासून वेतन मिळण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप करीत महाविद्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पत्रकार परिषदेत प्रा. रागिनी पाटील व इतर प्राध्यापकांनी सांगितले की, या महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांपासूनचे वेतन थकीत आहे. बँकेच्या चार महिन्याच्या ओडी मॅनेजमेंटने कर्मचाऱ्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या आहेत. एकूण १४ महिन्यांचे वेतन देण्यासाठी संस्थेकडे पैसे नाहीत. १८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे हप्ते अदा करण्यात आले नाही. आम्ही कर्मचारी कुठपर्यंत बिनपगारी काम करीत राहणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते व दैनंदिन गरजा कसे पूर्ण करणार, असा सवाल पाटील यांनी संस्थेला केला. वेतनाअभावी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मानसिक व आर्थिक हाल होत आहेत. शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे प्राध्यापकांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांचे पूर्ण प्रवेश होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही. पूर्वी संस्थेच्या चंद्रपूर येथील कॉलेजमधून गडचिरोलीच्या कॉलेजच्या खर्चासाठी पैसे येत होते. मात्र आता पैसे येणे बंद झाले आहे. आम्ही ५३ कर्मचारी स्थायी असून २५ अनियमित कर्मचारी आहेत. संस्थेला वेतन व इतर बाबींपोटी दोन कोटी रूपयाचे देणे आहे. तर कॉलेजला दीड कोटीची रक्कम येणे आहे. कॉलेजचा वार्षिक खर्च तीन कोटींचा आहे. संस्थेतील संचालकांच्या आपसी मतभेदामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाचे लक्ष नाही, असा आरोप पत्रकार परिषदेत केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्जाचे हप्ते कपात करण्यात आले. मात्र ही रक्कम बँकेत जमा झाली नाही. भविष्य निर्वाह निधीच्या हप्त्याची रक्कम, कर्मचारी सोसायटीचे लाखो रूपये प्रलंबित आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)विद्यार्थी येतात आणि परततातनामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थायी प्राध्यापकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय अस्थायी असलेल्या २५ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात आले आहे. प्राध्यापकांअभावी तासिका होत नसल्याने काही विद्यार्थी येतात व घरी परततात. विद्यार्थ्यांअभावी सदर कॉलेज ओस पडल्याचे सद्य:स्थितीत दिसून येत आहे.दोन शाखा बंद : विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्याने सदर महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स व कॉम्प्युटर सायन्स या दोन शाखा बंद झाल्या असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली आहे. अभियांत्रिकी शिक्षणाबाबत फारशी जनजागृती नसल्याने विद्यार्थ्यांचा कल कमी आहे.नामदेराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जुने ५० लाख व त्यानंतरचे दीड कोटी असे एकूण दोन कोटी रूपये शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण विभाग व शासनाकडे प्रलंबित आहे. सदर रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यावर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात येईल. सदर महाविद्यालयाचा आर्थिक प्रश्न लवकरच मार्गी लागेल.- बलबिरसिंग आर. गुरोन, प्रभारी प्राचार्य, नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली