वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 12:49 IST2022-01-21T12:46:41+5:302022-01-21T12:49:12+5:30

बैलाचा शाेध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.

man died in tiger attack in armori tehsil | वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

आरमाेरी (गडचिराेली) : गुरे घराकडे आणत असताना एका बैलाच्या शाेधात पुन्हा जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना गुरुवार २० जानेवारी राेजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.

आरमोरी तालुक्यातील कुरंझा गावापासून अडीच किमी अंतरावरील जंगलात हा ह्रदयद्रावक प्रसंग घडला. जालमशहा गोविंदशहा सयाम (६५) रा. कुरंझा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जालमशहा हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले हाेते. साेबत त्यांचा मुलगा भारत हा सुद्धा हाेता.

गुरे चारल्यानंतर घराकडे परत येत असताना कळपात एक बैल दिसून आला नाही. त्या बैलाचा शाेध घेण्यासाठी जालमशहा पुन्हा जंगलात गेले. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना ठार केले. बैल आला पण गुराखी मात्र कायमचाच निघून गेला.

Web Title: man died in tiger attack in armori tehsil