शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मलमपल्ली अवैध उत्खननाची चौकशी

By admin | Updated: January 8, 2015 22:54 IST

आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रातील मलमपल्ली राखीव वनातील कक्ष क्रमांक २८ मध्ये वनकर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात तत्काळ

अहेरी : आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रातील मलमपल्ली राखीव वनातील कक्ष क्रमांक २८ मध्ये वनकर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात तत्काळ चौकशी केली जाईल, असे आश्वासन आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनी वन्यप्रेमींच्या शिष्टमंडळाला दिले. ७ जानेवारी रोजी या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांची भेट घेतली. घटना घडून सहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही संबंधीत दोषिंवर कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. वन विभागाला मुरूम व अन्य गौण खनिज हवे असले तरीही ते काढण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. त्याची रॉयल्टी भरून त्यानंतरच ते काढता येऊ शकते. मात्र संरक्षीत वनक्षेत्रात वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. थोरात व वनरक्षक अतुल हजारे यांच्या उपस्थितीत खोदकाम करण्यात आले, ही गंभीर बाब आहे. हा मुद्दा वन्यप्रेमी रामू मादेशी यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांच्या निर्देशनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी चौकशीत विलंब लावला जाणार नाही, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)