मलमपल्ली अवैध उत्खननाची चौकशी

By Admin | Updated: January 8, 2015 22:54 IST2015-01-08T22:54:59+5:302015-01-08T22:54:59+5:30

आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रातील मलमपल्ली राखीव वनातील कक्ष क्रमांक २८ मध्ये वनकर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात तत्काळ

Malampalli illegal quarrying inquiry | मलमपल्ली अवैध उत्खननाची चौकशी

मलमपल्ली अवैध उत्खननाची चौकशी

अहेरी : आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रातील मलमपल्ली राखीव वनातील कक्ष क्रमांक २८ मध्ये वनकर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात तत्काळ चौकशी केली जाईल, असे आश्वासन आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनी वन्यप्रेमींच्या शिष्टमंडळाला दिले.
७ जानेवारी रोजी या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांची भेट घेतली. घटना घडून सहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही संबंधीत दोषिंवर कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
वन विभागाला मुरूम व अन्य गौण खनिज हवे असले तरीही ते काढण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. त्याची रॉयल्टी भरून त्यानंतरच ते काढता येऊ शकते. मात्र संरक्षीत वनक्षेत्रात वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. थोरात व वनरक्षक अतुल हजारे यांच्या उपस्थितीत खोदकाम करण्यात आले, ही गंभीर बाब आहे. हा मुद्दा वन्यप्रेमी रामू मादेशी यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांच्या निर्देशनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी चौकशीत विलंब लावला जाणार नाही, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Malampalli illegal quarrying inquiry