शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; दारूमुक्त निवडणुकीसाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षांपासून कायद्याने दारूबंदी आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने आपल्या गावातील दारू विक्री बंद करून ठेवली आहे.

ठळक मुद्देशेकडो महिलांचा निर्धार : गावात निवडणुकीदरम्यान दारूचा वापर होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २८७ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव ग्रामसभांमध्ये घेतला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षांपासून कायद्याने दारूबंदी आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने आपल्या गावातील दारू विक्री बंद करून ठेवली आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार बरेचदा घडतो. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद नाही. असे झाल्यास गावांनी परिश्रमाने टिकवून ठेवलेली दारूबंदी निकामी ठरते. त्यामुळे गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा निर्धार अनेक गावे करीत आहेत. सिरोंचा तालुक्यातील जंगलपल्ली, बालमुत्यमपल्ली, गोलगुडम चेक, ग्लासफोर्डपेठा, तुमनूरमाल, रामंजापूर, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली, दोड्डी, तोडसा, कुरखेडा तालुक्यातील गरगडा, खेरी, खेडगाव (गवळीटोला) आदी गावांनी गावात सभा घेऊन दारुमुक्त निवडणुकीचा निर्धार केला. निवडणूक काळात गावात दारूचा वापर करणार नाही, वापर होऊ देणार नाही, दारूचा वापर होताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय लोकांनी घेतला.

दारू पाजणाऱ्या उमेदवारांना मत विकू नका
लोकशाही बळकट करण्यासाठी दारूमुक्त निवडणूक पार पाडणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. याची जाणीव गावांना व्हावी, यासाठी सिरोंचा तालुक्यातील गोलगुडम, एटापल्ली तालुक्यातील तोडसा, जीवनगट्टा तर आरमोरी तालुक्यातील कोटेगाव, पळसगाव तर कुरखेडा तालुक्यातील खेडगाव येथील गाव संघटनांनी रॅली काढून जनजागृती केली. ज्याला दारूबंदी नको, तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत देऊ नका, ‘जो पाजील माझ्या नवºयाला दारू त्या उमेदवारला नक्कीच पाडू’ आशा घोषणा गाव संघटनांनी दिल्या.

टॅग्स :Womenमहिला