शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

भावी जोडीदार शोधताय, जन्मकुंडलीसह आरोग्यकुंडली पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:09 IST

तज्ज्ञ म्हणतात, आरोग्य जपा: तुळशी विवाहापासून शोधमोहीम होणार सुरु

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लग्न जुळविताना जन्मकुंडली पाहिली जाते. सध्याच्या काळात आरोग्याची कुंडली पाहणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जन्मपत्रिकेवरून एकमेकांचे स्वभाव कळत असले, तरी निरोगी वैवाहिक जीवन जगण्यासाठी 'आरोग्य कुंडली' पाहणेही महत्त्वाचे ठरत आहे. आता तुळशी विवाहापासून भावी जोडीदार शोधण्याची मोहीम सुरु होते. दरम्यान अनेक कुटुंबीयांनी आपल्या मुलामुलींच्या जन्मकुंडली तयार करून ठेवल्या आहेत. जन्मकुंडली पाहून पत्रिका जुळविली जाते. मात्र वैवाहिक जीवन यशस्वी व निरोगी बनण्यासाठी आरोग्यकुंडली पाहणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. 

लग्न ठरवताना अनेकजण जन्मकुंडली पाहतात, तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संकटाने आरोग्याबाबत नागरिकांना चांगलेच सतर्क केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आरोग्य कुंडली पाहणेही आवश्यक ठरणारे आहे. आरोग्याच्या दृष्टीने लग्नानंतर काही आरोग्याच्या समस्या उ‌द्भवणार असतील किंवा आधीपासूनच असतील, तर त्यावर वेळीच उपाययोजना करता येणे सहज शक्य होते. 

धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित तक्रारी या आहेतच; शिवाय ताणतणावाने आजच्या तरुण पिढीवर जणू कब्जाच केला आहे. त्यामुळे लग्नाआधी रीतसर तपासणी झाल्यास हे आजार समोर येतील आणि उपचार होतील, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींचे लग्न जुळविताना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. 

आरोग्य कुंडलीत काय बघाल? सिकलसेल स्क्रीनिंग: सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशीचा रोग आहे. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे. शरीर दुबळे करणाऱ्या वेदना हे प्रमुख लक्षण असलेल्या या आजारामुळे न्यूमोनिया, रक्तप्रवाहातील संसर्ग, स्ट्रोक आणि तीव्र किंवा दुर्धर वेदना अशा गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार पुढील पिढीमध्ये संक्रमित होणे टाळायचे असेल तर स्क्रीनिंग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

"आरोग्य कुंडली बघितली तर अनुवंशिक किंवा इतर आजाराची वेळीच माहिती मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने आपण जोडीदार म्हणून योग्य आहोत की नाही हे लग्नाआधीच ठरवणे अनेकदा योग्य ठरते. निरोगी वैवाहिक आयुष्य जगायचे असल्यास हेल्थ चेकअपला पर्याय नाही. तपासणी झाल्यानंतर आजार, तक्रारही असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करता येतात."- डॉ. प्रशांत आखाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली