शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीत कृषी सहायकाने दिले धान लावणीच्या पट्टा पद्धतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

# तुळशी येथिल शेतकरी मोरेश्वर दुनेदार यांच्या शेतात प्रात्यक्षिक तुळशी : तालुका कृषी कार्यालय वडसाच्या वतीने कृषी ...

# तुळशी येथिल शेतकरी मोरेश्वर दुनेदार यांच्या शेतात प्रात्यक्षिक

तुळशी : तालुका कृषी कार्यालय वडसाच्या वतीने कृषी सहाय्यक सुधाकर कोहळे यांनी तुळशी येथील शेतकरी मोरेश्वर दुनेदार यांच्या शेतात शेतकरी व मजुरांना धान लावणीच्या पट्टा पध्दतीचे महत्त्व व फायदे याचे धडे देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेतले.

शेतकरी धान पीक लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. मागील २-३ वर्षांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे धान पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने, उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने धान लागवडीची एक पट्टा पद्धत खूप किफायतशीर पध्दत प्रचलित झालेली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मोकळ्या पट्ट्यातून पिकांचे निरीक्षण करणे व फवारणी करणे, खते देणे, पिकातील भेसळ काढणे सोयीचे होते. फुटव्यांची संख्या वाढते, रोपांची संख्या कमी लागत असल्याने बियाणांची बचत होते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते. शेतकऱ्यांनी धान लागवड पट्टा पध्दतीने करावे, असे यावेळी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक सुधारक कोहळे यांनी केले. यावेळी शेतकरी मोरेश्वर दुनेदार उपस्थित होते.

(बॉक्स)

अशी असते पट्टा पद्धतीची लावणी

पट्टा पध्दतीत लवकर येणारे धान पिकाचे वाण २०:२० अंतरावर तसेच मध्यम व उशीरा येणारे धान पिकाचे वाण २५:२५ अंतरावर प्रती दोन ते तीन रोपे घेऊन उथळ व सरळ रोवणी करावी लागते. ८ ते १० ओळी सलग रोवणी झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडून पुन्हा रोवणी करावी लागते. लागवड शक्यतो पूर्व -पश्चिम दिशेने करावी. त्यामुळे दोन ओळीत हवा खेळती राहते. फवारणी करताना चालण्यासाठी आपण या ओळींचा वापर करू शकतो. ३०-४० सेमी जागा सोडल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचतात. तुडतुडाच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो.

100721\img-20210710-wa0016.jpg

# तुळशी येथिल शेतकरी मोरेश्वर दुनेदार यांच्या शेतात पट्टा पध्दतीने भात पिकाच्या लागवडचे प्रात्यक्षिक