शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आठ फुटांची भिंत पार करत बिबट्याने मारल्या 15 शेळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

आठ फुटाची संरक्षक भिंत ओलांडून गोठ्यातील चार शेळ्या बिबट्याने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच एकाच वेळी १५ शेळ्या बिबट्याने मारण्याचा प्रकारही आश्चर्यात टाकणारा आहे. यावरून हल्ला करणारा एकच बिबट्या नसून जास्त संख्येने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेत प्रभू नैताम यांचे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले. त्यांना वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव (चोप) : जंगलातून आलेल्या बिबट्याने गोठ्याची आठ फूट उंच भिंत ओलांडून गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. त्यात ११ शेळ्या जागीच ठार झाल्या तर ४ शेळ्या जंगलात पळवून नेण्यात बिबट्याला यश आले. देसाईगंज तालुक्यातील रावणवाडी टोली येथे मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. देसाईगंज तालुक्यातील बोडधा ग्रामपंचायतअंतर्गत रावणवाडी आणि रावणवाडी टोली ही दोन गावे येतात. या दोन गावांत चार किलोमीटरचे अंतर आहे. बुधवारच्या मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बिबट्याने भिंतीवरून प्रवेश केला. यावेळी गोठ्यात बांधून ठेवलेल्या अकरा शेळ्या बिबट्याने ठार केल्या. ४ जंगलात पळवून नेल्या, त्यात तीन बोकडांचा समावेश आहे. हा प्रकार सकाळच्या सुमारास लक्षात आला. या घटनेत प्रभू नैताम यांचे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले. त्यांना वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने कोरेगाव चौक, डोंगरमेंढा टोली परिसरातील नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

एकापेक्षा जास्त बिबट्यांची शक्यताआठ फुटाची संरक्षक भिंत ओलांडून गोठ्यातील चार शेळ्या बिबट्याने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच एकाच वेळी १५ शेळ्या बिबट्याने मारण्याचा प्रकारही आश्चर्यात टाकणारा आहे. यावरून हल्ला करणारा एकच बिबट्या नसून जास्त संख्येने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक कलवार   कानकाटे, रावणवाडीच्या वनरक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वनकर्मचाऱ्यांची गस्त लावलेली आहे. नागरिकांनी जंगलात एकट्याने फिरू नये. वनखात्याला सहकार्य करावे.- विजय धांडे, वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग, देसाईगंज

 

टॅग्स :leopardबिबट्या