शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
9
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
10
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
11
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
12
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
13
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
14
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
15
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
16
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
17
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
18
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
19
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
20
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

रांगी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Updated: July 26, 2015 02:46 IST

धानोरा तालुक्यातील रांगी व सोडे परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बिबट्याने रांगी येथील एक शेळी ठार ...

ंएक शेळी ठार, तीन शेळ्या जखमी : आश्रमशाळा महिला कर्मचाऱ्यावरही हल्ला
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी व सोडे परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बिबट्याने रांगी येथील एक शेळी ठार तर तीन शेळ्या जखमी केल्याची घटना उजेडात आली आहे.
रांगी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा परिसरात बिबट्याची गेल्या चार दिवसांपासून दहशत सुरू आहे. रांगी येथे शासकीय आश्रमशाळेला लागून जंगल आहे. गेल्या चार दिवसांपासून बिबट रात्रीच्या सुमारास आश्रमशाळेत फिरत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना आढळून आले. या आश्रमशाळेत ३०० विद्यार्थी शिकत असून २५ कर्मचारी निवासी राहतात. बिबट्याने रात्रीच्या सुमारास आश्रमशाळेतील एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून किरकोळ जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रांगीलगतच्या ताडामटोला येथील कालिदास मडावी यांच्या घरालगतच्या गोठ्यात शिरून रात्रीच्या सुमारास बिबट्याने एक शेळी ठार केली. तसेच तीन शेळ्यांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. त्यानंतर येथील रामलाल उसेंडी यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती आहे. बिबट्याच्या धुमाकुळामुळे रांगी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)