शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

राठोडच्या कारभाराची अजबच लीला

By admin | Updated: November 15, 2014 01:39 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय राठोड याला बुधवारी गडचिरोली ...

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय राठोड याला बुधवारी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. राठोडला गडचिरोली न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयात कार्यरत सहाय्यक लेखाधिकारी राठोड याच्या कारणाम्याचे अनेक प्रकरण या घटनेनंतर आता चर्चेला आले आहे. गडचिरोली शहरातील अनेक शिक्षण संस्थांना आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची गडगंज रक्कम पोहोचविण्यासाठी राठोड अथक परिश्रम पैशाच्या लोभापायी करीत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या शिक्षण संस्थांनी समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या नोंदवून दोनही ठिकाणावरून मोठ्या शिष्यवृत्तीच्या पोटी मिळणाऱ्या रकमा गडप केल्या आहे. आदिवासी विकास विभागात अशा संस्थांना राठोड पूर्ण मदत करीत होते. यातील काही संस्थांनी आदिवासी विकास विभागाकडे नोंदविलेली पटसंख्या व समाज कल्याण विभागाकडे नोंदविलेली पटसंख्या ही तफावत दाखविणारी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली शहरातील काही संस्थांचा हा धंदा जोरात सुरू होता. या संस्थांना सर्व मार्गदर्शन राठोड यांचेच मिळत होते, अशी माहिती पुढे आली आहे. काही संस्थांनी तर आपल्या पटसंख्येपेक्षाही अधिक शिष्यवृत्ती आदिवासी विकास विभागाकडून उचल केली, याला राठोड यांचेच सहकार्य कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.