शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडेश्वराच्या पालखीचे घेतले लाखो भाविकांनी दर्शन

By admin | Updated: February 28, 2017 00:45 IST

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मार्र्कंडेश्वराची पालखी सोमवारी काढण्यात आली. यावेळी यात्रेतील लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

चौथ्या दिवशी गर्दी कायमच : सनई, चौघडे व भजन मंडळही दिंडीत सहभागीचामोर्शी/मार्र्कंडादेव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मार्र्कंडेश्वराची पालखी सोमवारी काढण्यात आली. यावेळी यात्रेतील लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मार्र्कंडा येथील मराठा धर्मशाळेच्या परिसरातून मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. सदर पालखी यात्रेमध्ये फिरविण्यात आली. ढोल, ताशे, सनईच्या गजरात व भजनाच्या निनादात हर हर महादेवच्या गजरात पालखी काढण्यात आली. दरम्यान संपूर्ण मार्र्कंडा नगरी हर हर महादेवच्या गजराने दुमदुमली होती. पालखीच्या सुरूवातीला श्री मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात शिवलिंगाची आरती व पूजा ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी बालस्वामी पिपरे महाराज, रामू महाराज, मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, पा. गो. पांडे, सहसचिव रामूजी तिवाडे, रामप्रसाद मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष रामेश्वर काबरा, सचिव अशोक तिवारी, सहसचिव केशव आंबटवार, विश्वस्त प्रकाश कापकर, मोरेश्वर कतरे, हरिभाऊ खिनखिनकर, गोपाल रणदिवे, चरणदास उजेडे महाराज, जनार्धन जुनघरे, पुरूषोत्तम शेंडे आदी उपस्थित होते. पालखीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी जाळला टिपूरमार्र्कंडादेव येथे यात्रा काळात टिपूर लावण्याची परंपरा गोंडराजांपासून चालत आली आहे. रविवारी वैनगंगा नदीच्या तिरावर टिपूर लावण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, उमेश, उज्वल गायकवाड, ऋषी आभारे, रामू तिवारे आदी उपस्थित होते. तिसऱ्या व चौथ्या दिवशीही यात्रेत भाविकांची गर्दी कायमच होती.