शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : सिराेंचा तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्यांचा अभाव आहे. शासकीय व खासगी नाेकऱ्याही नाहीत. त्यामुळे या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सिराेंचा : सिराेंचा तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्यांचा अभाव आहे. शासकीय व खासगी नाेकऱ्याही नाहीत. त्यामुळे या भागातील सुशिक्षित युवक व अल्प शिक्षित मजूर राेजगारासाठी तेलंगणा राज्यात धाव घेत आहेत. राेजगार हमी याेजनेची कामे बंद असल्याने स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या वाढली असल्याचे बाेलले जात आहे.

ब्रिटिश काळात सिराेंचा तालुक्याला प्रचंड महत्त्व हाेते. सिराेंचा तालुका नदी, नाले, जंगल व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या असून, येथे सिंचन सुविधा ताेकडी आहे. उद्याेगासाठी सर्व गाेष्टी उपलब्ध असतानासुद्धा शासनाच्या उदासीन धाेरणामुळे तालुक्यात माेठे उद्याेग स्थापन हाेऊ शकले नाही. परिणामी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील मजूर वर्ग दरवर्षी, मिरची व साेयाबीन ताेडण्याच्या कामासाठी माेठ्या संख्येने तेलंगणात जात असतात.

चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या कुनघाडा रै. येथील २० मजुरांचा जत्था वाहनाने तेलंगणाकडे जात हाेता. तेलंगणातील कंत्राटदाराने पाठविलेले वाहन सिराेंचापासून २५ कि.मी. अंतरावर कंबालपेठा गावानजीक पंक्चर झाले. दरम्यान, राेमपल्ली-कंबालपेठा दरम्यानच्या जंगलात मजूर अडकून पडले. काेराेनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुला, मुलींसह गावातील लाेक राेजगारासाठी तेलंगणात जात असल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स....

तीन वर्षांपासून कामासाठी स्थलांतर

चामाेर्शी तालुक्याच्या कुनघाडा (रै.) परिसरात शेती आहे. भरपूर शेती असणारे, तसेच नाेकरी असणारे लाेक साेडले तर इतर सर्वजण राेजगारासाठी जिल्ह्याबाहेर जातात. आमच्या परिसरात राेजगार हमीची कामे नसल्याने आम्हाला जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून सतत घर साेडून लहान मुला, मुलींसाेबत तेलंगणात मिरची ताेडण्याच्या कामासाठी जात आहाेत, असे मजूर दिलीप काेसमशिले यांनी सांगितले.