शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

कोटगल परिसर झाला बनावट दारूविक्रीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी मुख्य आरोपी पोलिसांना हुलकावण्यात देत आहे.

ठळक मुद्देकारवाया वाढल्या : आरोपी मात्र पसार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी मुख्य आरोपी पोलिसांना हुलकावण्यात देत आहे.गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये छत्तीसगडसह गोंदिया जिल्ह्यातून दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. देसाईगंज पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या दारूच्या वाहनांवर कारवाया सुरू केल्या आहे. मात्र तरीही ही वाहतूक सुरूच असल्यामुळे या व्यवसायात अनेक लोक गुंतले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच गोंदियात विक्री होणारी दारू बनावट असल्यामुळे मद्यप्रेमींचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे त्या दारू विक्रेत्यांबद्दल नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे.कोटगल, इंदाळा, मुरखडा या भागातील वाढते दारूविक्रीचे प्रस्थ पाहून नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेला रुजू झालेले पोलीस निरीक्षक उल्हास भुसारे यांनी गेल्या ३-४ दिवसात कारवाया सुरू केल्या. या दारूसाठा जप्तीसह काही जणांना ताब्यातही घेण्यात आले. पण काही प्रमुख आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.एलसीबीसोबतच गडचिरोली ठाण्यानेही या भागात लक्ष केंद्रीत केल्यास बनावट दारू विक्रीला आळा बसू शकेल. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दारू विक्रीला आणखी उधाण येणार आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी