२५ वर्षांपासून चपराळात कार्तिक उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:01:18+5:30

पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस सकाळ व सायंकाळी ६ वाजता महाआरती होणार आहे. रात्री भजने सादर केली जाणार आहेत. मुर्लीधर महाराज हरणघाट यांच्यातर्फे कार्तिक स्वामी महाराजांची पालखी हरणघाट येथून काढून दोटकुली, खंडाळा, रामाळा, फोकुर्डी, मार्र्कं डादेव, चाकलपेठ, कान्होली, लखमापूर बोरी, गणपूर रै., कढोली, अनखोडा, आष्टी, इल्लूर, कुनघाडा मार्गे चपराळा येथे दाखल होणार आहे. १७ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता पालखीचे आगमन होणार आहे

Kartik festival in Chaparral for 25 years | २५ वर्षांपासून चपराळात कार्तिक उत्सव

२५ वर्षांपासून चपराळात कार्तिक उत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाही उसळत आहे भाविकांची गर्दी; पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे हनुमान मंदिर प्रशांतधाम चपराळा या तीर्थक्षेत्रस्थळी गेल्या २५ वर्षांपासून कार्तिक मास गोपालकाला उत्सवाची परंपरा आहे. यंदा या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे.
१४ नोव्हेंबरपासून या उत्सवाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस सकाळ व सायंकाळी ६ वाजता महाआरती होणार आहे. रात्री भजने सादर केली जाणार आहेत. मुर्लीधर महाराज हरणघाट यांच्यातर्फे कार्तिक स्वामी महाराजांची पालखी हरणघाट येथून काढून दोटकुली, खंडाळा, रामाळा, फोकुर्डी, मार्र्कं डादेव, चाकलपेठ, कान्होली, लखमापूर बोरी, गणपूर रै., कढोली, अनखोडा, आष्टी, इल्लूर, कुनघाडा मार्गे चपराळा येथे दाखल होणार आहे. १७ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता पालखीचे आगमन होणार आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता गोपालकाला व महाप्रसाद वितरण होणार आहे. या उत्सवाला जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील भाविकांची गर्दी उसळत आहे.

Web Title: Kartik festival in Chaparral for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.