शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अडपल्ली परिसरातील जंगलाला आग

By admin | Updated: April 9, 2017 01:35 IST

कोनसरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अडपल्ली-गुंडापल्ली मार्गावरील जंगलाला शुक्रवारी

वन विकास महामंडळाचे दुर्लक्ष : भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातही वणवा गडचिरोली : कोनसरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अडपल्ली-गुंडापल्ली मार्गावरील जंगलाला शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. कोनसरी वन परिक्षेत्रातील १७२, १७५, १८८ क्रमांकाच्या कंपार्टमेंटला दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास अर्धा किमी परिसरातील जंगल जळून खाक झाले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विकास महामंडळाला दिली. मात्र याकडे वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सायंकाळपर्यंत वनवा सुरूच होता. त्याचबरोबर मार्कंडा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१५ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्येही आग लागली. या आगीतही कोट्यवधी रूपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. गट्टा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोठी परिसरातही जंगलाला आग लागली. ऊन कडक होत चालल्याने जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच दक्ष असणे आवश्यक आहे. वनवा नियंत्रणात आणण्याबरोबरच वनवा लागू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाने वन विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र वन विभागातर्फे सदर निधी केवळ कागदोपत्री खर्ची केला जातो. पाहिजे त्या प्रमाणात वनवा नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने वनवे लागण्याचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वनव्याची माहिती देऊनही वनकर्मचारी वेळेवर पोहोचत नसल्याची दयनीय स्थिती आहे. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)