शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कळमटोला येथे जलपूजन

By admin | Updated: August 18, 2016 01:42 IST

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी तालुक्यातील कळमटोला येथील सीताबाई देविदास गेडाम यांच्या शेतावर...

पालकमंत्र्यांच्या हस्ते : जलयुक्त शिवारमधून ५० कामे पूर्ण गडचिरोली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी तालुक्यातील कळमटोला येथील सीताबाई देविदास गेडाम यांच्या शेतावर राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जयंत पिळगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. कळमटोला हे गडचिरोलीच्या उत्तर पूर्वेस असून गडचिरोलीपासून १४ किमी अंतरावर आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र ६४५.५१ हेक्टर आहे. येथे एकूण ६३ सिंचन विहिरी आहेत. या ठिकाणी धानाचे मुख्य पीक असून त्याची उत्पादकता १४०० किलो तांदूळ प्रतिहेक्टर आहे. मुख्यत्वे कळमटोला हे गाव कोरडवाहू असून या गावात नदी, नाले नाहीत. येथे ८७.५५ हेक्टर शेती सिंचन क्षेत्र आहे. त्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या कृती आराखड्यात करण्यात आली. याअंतर्गत या गावात कृषी विभागाच्या वतीने एकूण जलसंधारणाची ५० कामे पूर्ण करण्यात आली. पंचायत समितीमार्फत या गावात जलसंधारणाची १३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून येथे सिंचन सुविधा निर्माण झाली असल्याने हरितक्रांतीकडे वाटचाल सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)