सुरजागडची लोहखाण उठतेय सामान्य कामगारांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:00 AM2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:32+5:30

२६ फेब्रुवारीला ज्या युवकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या युवकाच्या पत्नीनेही या हत्येसाठी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी मायनिंग कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कंपनीने या हत्येचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

The iron mine of Surjagad is rising on the lives of ordinary workers | सुरजागडची लोहखाण उठतेय सामान्य कामगारांच्या जिवावर

सुरजागडची लोहखाण उठतेय सामान्य कामगारांच्या जिवावर

googlenewsNext
ठळक मुद्देनक्षलवाद्यांचा रोष; हत्या झालेल्या युवकाच्या पत्नीचा लॉयड्स आणि त्रिवेणी कंपनीवर ठपका

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याला औद्योगिक विकासाच्या नकाशावर आणत विकासाचे स्वप्न दाखवणारी सुरजागड लोहखाण आणि लॉयड्स मेटल्सचा कोनसरीतील स्टिल प्लान्ट अजूनही अधांतरीच आहे. आता पुन्हा लोहखाणीचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना त्यासाठी सहकार्य करणारे सामान्य लोक नक्षलवाद्यांच्या रडारवर आले आहेत. 
२६ फेब्रुवारीला ज्या युवकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या युवकाच्या पत्नीनेही या हत्येसाठी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी मायनिंग कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कंपनीने या हत्येचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी ते नक्षलवादी कंपनीसाठी (लोहखाण) काम करत असल्याबद्दल त्याला बोलत होते.
सुरजागड प्रकल्प नव्याने सुरू होत असल्याचे सांगत लॉयड मेटल्स व त्रिवेणी मायनिंग कंपनीने या कामासाठी माणसे मिळवून देण्यास आपल्या पतीला सांगितले होते. त्यामुळे तो चार महिन्यांपासून गावागावात जाऊन युवकांची कागदपत्रे गोळा करून देत होता. याला नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने त्याचा राग मनात ठेवून नक्षलवाद्यांनी त्याला मारल्याचे मृतक अशोकची पत्नी बेबी हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे नागरिक काहिसे दहशतीत आहेत.

पोलीस सुरक्षेच्या भाड्याचे कोट्यवधी थकीत?
दोन वर्षांपूर्वी सदर लोहखाणीतून कच्चा माल काढताना आणि तो लॉयड मेटल्सच्या घुग्गुस येथील कारखान्यात नेताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविला जात होता. त्याच्या भाड्यापोटी पोलीस विभागाची ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकीत आहे. ते पैसे अजूनही कंपनीने भरलेले नसताना आता पुन्हा विनामोबदला सदर कंपनीला पोलीस संरक्षण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोनसरीचा प्रकल्प अधांतरीच
सुरजागडच्या लोहखाणीला जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीच्या अटीवरच लीज मंजूर केली होती. त्यासाठी कोनसरी येथे साडेतीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. पण नंतर लोहदगडांची वाहतूक सुरूच राहूनही प्रकल्पाच्या उभारणीत कोणतीही प्रगती झाली नाही. यावरून हा प्रकल्प खरोखरच गडचिरोली जिल्ह्यात होणार की नाही, यावरही आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

 

Web Title: The iron mine of Surjagad is rising on the lives of ordinary workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.