शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचे आवाहन : सिरोंचा येथे आढावा बैठक

By admin | Updated: June 5, 2015 01:37 IST

केेंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेसाठी शेकडो योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, ...

योजना जनतेपर्यंत पोहोचवा
सिरोंचा : केेंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेसाठी शेकडो योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
सिरोंचा येथे आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, प्रकाश गेडाम, बाबुराव कोहळे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सिरोंचा येथील नागरिक उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत. मात्र दुर्गम भागातील नागरिकांना या योजनांची माहिती नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक योजनांपासून वंचित असल्याचे चित्र दुर्गम व ग्रामीण भागात दिसून येते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक असलेली मदतही दिली पाहिजे. शासकीय यंत्रणेने शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या दोनही योजना नागरिकांना अत्यंत कमी पैशामध्ये विम्याचे संरक्षण देत आहेत. त्यामुळे या योजनांची जास्तीत जास्त माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. सदर विमा बँकेच्या मार्फत काढला जात असला तरी या योजनांची माहिती शासकीय कर्मचाऱ्यांनीसुद्धा द्यावी, असे मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. अपूर्ण असलेली कामे अधिकाऱ्यांनी पूर्ण करावी, काही दिवसांतच शेतीच्या हंगामाला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)