शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात करा गुंतवणूक ! प्रत्येक महिन्याला वाढते किंमत, सराफा बाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:11 IST

Gadchiroli : सोने तारण ठेवून काही वेळातच उपलब्ध होते कर्ज

विलास चिलबुले लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे नवनवा उच्चांकी दर गाठला जात आहे. त्यामुळे ग्राहकदेखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.

भारतात सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. प्रत्येक घरात थोडे का होईना पण सोन्याचे दागिने असतात. गरजेच्या वेळी हेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा मोडून आर्थिक अडचण दूर करता येते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याला भारतीय प्राधान्य देतात.

आता सोन्याचे भाव प्रतितोळा ८६ हजार रुपये झाले असून, यात गुंतवणूक केली तर भविष्यात १५ टक्के रिटर्न मिळतील, असा अंदाज सराफ बाजाराने व्यक्त केला आहे. १५ टक्के परतावा उद्योग व्यवसायामध्येसुद्धा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक योग्य मानली जाते. मात्र सोन्यातील गुंतवणूक अचल असल्याने काही गुंतवणूकदार सोन्यामध्ये फारशी गुंतवणूक करीत नसल्याचे दिसून येते.

सोन्यातील गुंतवणूक नेमकी कशासाठी करावी ?सोन्याची किंमत महागाईप्रमाणे वाढते. बँकेत मिळणारे व्याज आणि चलनवाढ यांचा विचार केल्यास, सोन्यात गुंतवणूक हा एकच गुंतवणूक पर्याय आहे. सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे. 

१५ टक्के भाव वाढले तरी दागिण्यांसाठी खरेदी वाढलीपरतावा सोन्याच्या गुंतवणुकीतून उपलब्ध होते. विशेष म्हणजे, सोन्याच्या गुंतवणुकीत फारशी जोखीम नाही. व्यवस्थापनाची जबाबदारी राहत नाही.

पाच वर्षांत रिटर्न किती?सोन्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल ११२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात २ आहे. इतकेच नाही तर येत्या काही दिवसांत सोन्याचा दर २० हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

पाच वर्षांतील आकडे ?महिना                     सोने (प्रति तोळा)              चांदी (प्रति किलो)फेब्रुवारी २०२१             ४६,२६०                               ६८,९००फेब्रुवारी २०२२             ५१,२११                                ६४,९५०फेब्रुवारी २०२३             ५६,१७०                               ६३,०००फेब्रुवारी २०२४             ६२,८३०                               ७३,९००फेब्रुवारी २०२५             ८६,२५०                               ९८,५००

"सोने दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. दरवाढीचा फटका सामान्य कुटुंबातील वधू-वर पक्षांना बसला आहे" - अंकुश खरवडे, व्यापारी

"सोन्याच्या वाढत्या भावामुळे सराफा व्यवसायात मोठी मंदी झाली आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या दरवाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे."- अक्षय बेहेरे, व्यापारी

टॅग्स :GoldसोनंGadchiroliगडचिरोली