घराला आग लागल्याने बैलजोडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:56 IST2019-03-28T23:56:11+5:302019-03-28T23:56:31+5:30
कुरखेडा तालुक्यातील कराडी येथे विद्युत तारांच्या सर्कीटमुळे घराला आग लागली. यामध्ये बैलजोडी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

घराला आग लागल्याने बैलजोडी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील कराडी येथे विद्युत तारांच्या सर्कीटमुळे घराला आग लागली. यामध्ये बैलजोडी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.
हिवराज देवाजी दर्रो यांनी काही दिवसांपूर्वी घरात वीज पुरवठा घेतला होता. लाईन फिटींग झाली नव्हती. त्यामुळे खुले वायर टाकून वीज पुरवठा सुरू होता. तथा २७ मार्चच्या रात्री अचानक शार्टसर्कीट झाल्याने आग लागली.
गावकऱ्याच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आग आटोक्यात आली नाही. या आगीत घरातील अन्न धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच गोठ्यात बांधलेली बैलाची जोडी जखमी झाली. तलाठी व्ही. एम. कुंभारे, पोलीस पाटील लोकनाथ उईके यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये जवळपास ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.