शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीतून एसटीला आठ लाख रुपयांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने चालण्याची शक्यता आहे. तोपर्यंत एसटीची प्रवाशी वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे. लाखो एसटी कर्मचाऱ्यांना काम उरले नाही.

ठळक मुद्देदोन महिन्यातील स्थिती : १४ ट्रक आहेत उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात माल वाहतुकीला सुरूवात केली आहे. गडचिरोली विभागाने मागील दोन महिन्यात ८ लाख २६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रवाशी वाहतुकीच्या तुलनेत सदर उत्पन्न अतिशय कमी असले तरी एसटीचा तोटा कमी करून कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने चालण्याची शक्यता आहे. तोपर्यंत एसटीची प्रवाशी वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे. लाखो एसटी कर्मचाऱ्यांना काम उरले नाही.एसटीकडे काही जुनी वाहने आहेत. सदर वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरण्यास परवानगी नसली तरी मालवाहतुकीसाठी सदर वाहने वापरता येणे शक्य असल्याने या वाहनांच्या मदतीने मालवाहतूक करण्याची संकल्पना एसटीने पुढे आणली. जून महिन्यापासून माल वाहतुकीला सुरूवात झाली. जून महिन्यात ४ लाख २७ हजार ४१७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर जुलै महिन्यात ३ लाख ९८ हजार ९३५ रुपयांचे उत्पन्न आजपर्यंत मिळाले आहे. गडचिरोली विभागाकडे असलेल्या १४ ट्रकच्या माध्यमातून माल वाहतूक केली जात आहे.फाटलेली ठिगळं शिवण्याचा प्रयत्नलॉकडाऊनमुळे प्रवाशी वाहतुकीपासून मिळणारे उत्पन्न नाहीच्या बरोबर आहे. कर्मचाºयांचे वेतन व इतर खर्च कायम असताना उत्पन्न मात्र बंद आहे. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत आहे. अशातच एसटीने माल वाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्याला तुर्तास तरी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. माल वाहतुकीच्या क्षेत्रात एसटी नवीन आहे. अधिकारी व कर्मचाºयांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात माल वाहतुकीसाठी आॅर्डर मिळाल्या नाही. मात्र अनुभवातून शिकून एसटी माल वाहतुकीच्याही क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवेल, असा विश्वास एसटीच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.

टॅग्स :state transportएसटी