शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास कामात दिसतो असमतोलपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

आरमोरी नगर पालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान, विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, दलित वस्ती व दलितेत्तर विकास निधीमधून रस्ते, नाली बांधकामे होत आहेत. नगर पालिकेमध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. या १७ ही वॉर्डात वीज, पाणी, रस्ते, नाली आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेचा अजब कारभार : विरळ वस्तीत झाली लाखोंची कामे

विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून शहरात रस्ते व नाली बांधकामे केली जात आहेत. मात्र विकास कामांचे योग्य नियोजन करण्यात न आल्याने शहराच्या विकासात असमतोलपणा वाढला आहे. आवश्यकता असलेल्या वॉर्डात विकास कामे होत नसल्याने त्या भागातील नागरिक प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.आरमोरी नगर पालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान, विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, दलित वस्ती व दलितेत्तर विकास निधीमधून रस्ते, नाली बांधकामे होत आहेत. नगर पालिकेमध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. या १७ ही वॉर्डात वीज, पाणी, रस्ते, नाली आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र शहर विकास तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबतच्या कामात समतोलपणाचा विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. विकसित भागाकडेच अधिक लक्ष देऊन तेथे लाखो रुपयांची कामे केली जात असल्याचे दिसून येते. शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये विरळ वस्तीत मुजबूत रस्ता असताना सुद्धा रस्ता बांधकाम करण्याची गरज नव्हती. मात्र गजानन नगरात लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सदर भागात दूर-दूर घरे असून वस्ती विरळ आहे. सदर वस्तीत रस्ते व नालींची कामेही केली जात आहेत. शहराच्या प्रगती चौकासमोर इटियाडोहलगत वस्ती आहे. या वस्तीत सर्वसामान्य व गरीब नागरिक वास्तव्य करतात. प्रभाग क्र. ३ मध्येच सीसी रोडचे काम झाले. मात्र ते विरळ वस्तीत झाले. गजानन नगर व प्रगतीनगर हे दोन्ही भाग एकाच प्रभागात येतात.इटियाडोहलगत असलेल्या वस्तीमधील रस्ता पूर्णत: उखडला आहे. येथे नाली कामाचा अभाव आहे. अनेकदा मागणी करूनही या भागातील समस्यांकडे प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे.शहराच्या वॉर्डातील विकासकामे नगरसेवक सुचवित असतात. कोणत्या ठिकाणी रस्ते, नाली बांधकाम पाहिजे त्यानुसार नियोजन बैठकीत चर्चा करून ही कामे मंजूर केली जातात. शहराच्या ज्या वस्तीत रस्ते बनविणे गरजेचे आहे, तिथे लक्ष देण्यात येईल.- सचिन राऊत,मुख्याधिकारी, न.प. आरमोरीनगर परिषद प्रशासनाला रस्ते व नाली बांधकामाबाबत निवेदन देण्यात आले. तक्रार करून सुद्धा प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही. नगरसेवकांचे सुद्धा आमच्या वस्तीतील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.- कुंदन निकुरे,नागरिक, प्रगतीनगर, आरमोरी